Skip to content
Nanded Times
Menu
  • Home
  • E- Paper
  • International
  • National
  • Nanded
  • Sports
  • About US
  • Contact US
  • Privacy Policy
Menu

विधान परिषदेमधील रिक्त पाच जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

Posted on 03/03/2025
Spread the love

मुंबई:महाराष्ट्र विधान परिषदेमधील रिक्त झालेल्या पाच जागांसाठी निवडणूक आयोगाकडून निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. विधानसभा सदस्यांकडून निवडण्यात येणाऱ्या या पाच जागांसाठी २७ मार्च रोजी मतदान होणार असून, त्याच दिवशी संध्याकाळी निकाल जाहीर होणार आहेत. विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर विधान परिषदेचे सदस्य असलेल्या पाच आमदारांनी राजीनामा दिल्याने या जागा रिक्त झाल्या होत्या. या पाच जागांसाठी हे मतदान होणार आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमश्या पडवी, प्रवीण दटके, राजेश विटेकर, रमेश कराड आणि गोपिचंद पडळकर हे विधान परिषदेतील आमदार विधानसभेवर निवडून गेले होते. विधानसभेवर निवड झाल्यानंतर या पाचही जणांनी आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे या पाच जागा रिक्त झाल्या आहे.या निवडणुकीसाठी १० मार्च रोजी अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे. तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही १७ मार्च असेल. १८ मार्च रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठीची शेवटची तारीख २० मार्च असेल. २७ मार्च रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ४ या वेळेत मतदान होईल. तर मतदान पूर्ण झाल्यानंतर संध्याकाळी पाच वाजता मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल.

Recent Posts

  • राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप,निवडणूक आयोग गप्प का?: हर्षवर्धन सपकाळ.
  • महाराष्ट्रात लोकशाही पराभूत झाली नाही, जनमताची चोरी करण्यात आली: रमेश चेन्नीथला
  • ‘अब रेस का घोड़ा रेस में होगा, बारात का घोड़ा जुलूस में होगा और लंगड़ा घोड़ा घर जाएगा’: राहुल गांधी
  • مولانا مظہر الحق کامل قاسمی کی دینی خدمات نا قابل فراموش: مولانا امیر اللہ خان قاسمی
  • काँग्रेस पक्ष राज्यात ‘संविधान बचाव’ व ‘सद्भावना यात्रा’ काढणार: हर्षवर्धन सपकाळ

About US

NANDED TIMES IS A LEADING LOCAL URDU DAILY NEWS PAPER AND ALSO MARATHI WEEKLY NEWS PAPER PUBLISHED FROM NANDED

Contact US

NANDED TIMES SHOP NO 17 MASJID ABEDIN COMPLEX,NAI ABADI,OPP SBI BANK,SHIVAJI NAGAR,NANDED-431602 email- nandedtimes@yahoo.com
©2025 Nanded Times | Design: Newspaperly WordPress Theme