नांदेड,7- उन्हाळ्याच्या वाढत्या उष्णतेचा विचार करून व विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी घेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी शाळांचे वेळापत्रक बदलण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आता सकाळच्या सत्रात भरवण्यात बाबत निर्णय जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल कारनवाल यांनी घेतला आहे..
हा निर्णय आजपपासून लागू करण्यात आला असून शाळा सकाळी 8:30 वाजता सुरू होईल व दुपारी 1 वाजेपर्यंत चालणार आहे. शाळांमध्ये तिस मिनिटांची मध्यांतर राहणार आहे. दोन सत्र पद्धतीने चालणाऱ्या शाळांनीही यासंदर्भात ठरवलेले वेळापत्रक पाळावे लागेल आहे.
आरटीई अधिनियम 2009 नुसार विद्यार्थ्यांच्या शिक्षण तासांमध्ये कोणताही बदल होणार नाही. तसेच शिक्षकांनी पूर्ण वेळ उपस्थित राहून अध्यापनाचे नियोजन करावे. गटशिक्षणाधिकारी आपल्या तालुक्यातील शाळांचे वेळापत्रक निश्चित करून त्याची अंमलबजावणी करावी. तसेच त्यांनी वेळोवेळी शाळांना भेट देऊन नियमानुसार शाळा सुरळीत सुरू आहेत की नाहीत, याची खात्री करावी.
विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला असून उन्हाळ्यातील उष्णतेपासून विद्यार्थ्यांना संरक्षण मिळावे व त्यांच्या आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी शाळा प्रशासनाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी दिले आहेत.