Skip to content
Nanded Times
Menu
  • Home
  • E- Paper
  • International
  • National
  • Nanded
  • Sports
  • About US
  • Contact US
  • Privacy Policy
Menu

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

Posted on 17/03/2025
Spread the love

नांदेड दि. 17 मार्च :- देशातील युवकांना कंपनी, आस्थापनेमध्ये अनुभवाची संधी प्राप्त करून देण्यासाठी भारत सरकारने प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना अर्ज प्रक्रिया सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 24 वर्षे वयोगटातील तरुणांना इंटर्नशिप दिली जाणार आहे. प्रधानमंत्री इंटर्नशिपसाठी नांदेड जिल्ह्यात एकूण 11 आस्थापनांनी http://pminternship.mca.gov.in/ यासंकेतस्थळावर रिक्तपदे अधिसुचित केलेली आहेत.
या योजनेचा जिल्ह्यातील दहावी, बारावी, ग्रॅज्युएट, आयटीआय या शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त रेणूका तम्मलवार यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 02462-251674 वर संपर्क साधावा, असेही कळविले आहे.
कंपनी, आस्थापनाचे नाव बजाज फायनान्सं लि., बायरक्रॉप सायन्सं लि., हॅवेल्स इंडिया लि. गोदरेज कंज्यूमर प्रॉडक्ट्स लि., एच.डी.एफ.सी. बँक लि., इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि., इंड्युसंड बँक लि. ज्युब्लीयंट फूडवर्कस लि., रिलायंन्स इंडस्ट्रीज लि., मेघा इंजिनियरिंग & इन्फ्रास्ट्रक्चरलि. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लि. या नामांकीत कंपनी/आस्थापना यांनी http://pminternship.mca.gov.in/ यासंकेतस्थळावर रिक्तपदे अधिसूचित केलेली आहेत. यासाठी उमेदवाराचे वय 21 ते 24 पर्यंत असावे व दहावी/बारावी/ ग्रॅज्युएट/ आय.टी.आय. या शैक्षणिक पात्रतेचे उमेदवार अर्ज करू शकतात.
अर्ज कसा करावा : या योजनेसाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांनी http://pminternship.mca.gov.in/ या संकेतस्थळावर नोंदणी करून प्रोफाईल तयार करावी व विविध क्षेत्रातील इंटर्नशिपसाठी अर्ज करावा. या योजनेंतर्गत युवकांना 12 महिन्यांसाठी इंटर्नशिप लाभ घेता येईल. तसेच यासोबतच त्यांना दरमहा 5 हजार रुपये इंटर्नशिप रक्कम मिळेल. याशिवाय इंटर्नशिप पुर्ण झाल्यानंतर 6 हजार रुपये एकरकमी अनुदान मिळेल. या योजनेंतर्गत भारत सरकारकडून प्रत्येक प्रशिक्षणार्थींना प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षण प्रदान केले जाईल.

Recent Posts

  • राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप,निवडणूक आयोग गप्प का?: हर्षवर्धन सपकाळ.
  • महाराष्ट्रात लोकशाही पराभूत झाली नाही, जनमताची चोरी करण्यात आली: रमेश चेन्नीथला
  • ‘अब रेस का घोड़ा रेस में होगा, बारात का घोड़ा जुलूस में होगा और लंगड़ा घोड़ा घर जाएगा’: राहुल गांधी
  • مولانا مظہر الحق کامل قاسمی کی دینی خدمات نا قابل فراموش: مولانا امیر اللہ خان قاسمی
  • काँग्रेस पक्ष राज्यात ‘संविधान बचाव’ व ‘सद्भावना यात्रा’ काढणार: हर्षवर्धन सपकाळ

About US

NANDED TIMES IS A LEADING LOCAL URDU DAILY NEWS PAPER AND ALSO MARATHI WEEKLY NEWS PAPER PUBLISHED FROM NANDED

Contact US

NANDED TIMES SHOP NO 17 MASJID ABEDIN COMPLEX,NAI ABADI,OPP SBI BANK,SHIVAJI NAGAR,NANDED-431602 email- nandedtimes@yahoo.com
©2025 Nanded Times | Design: Newspaperly WordPress Theme