उन्हाळ्यात होणारी प्रवाशांची गर्दी पाहता दक्षिण मध्य रेल्वे ने नांदेड-पनवेल- नांदेड एस्प्रेस आणि नांदेड-पुणे-नांदेड एक्स्प्रेस मध्ये दोन डब्यांची वाढ तात्पुरत्या स्वरुपात करण्याचे ठरविले आहे, ते पुढील प्रमाणे –
1) गाडी क्रमांक 17614 / 17613 हजूर साहिब नांदेड – पनवेल – हजूर साहिब नांदेड एक्स्प्रेस मध्ये एक तृतीय श्रेणी वातानुकुलीत डब्बा आणि एक द्वितीय श्रेणी शयन यान (स्लीपर क्लास) चा डब्बा असे दोन डब्बे हजूर साहिब नांदेड येथून सुटणाऱ्या गाडीत दिनांक 1 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत आणि पनवेल येथून सुटणाऱ्या गाडीत दिनांक 02 एप्रिल ते 01 मे पर्यंत वाढविण्यात आले आहेत, या वाढी नंतर या गाडीत डब्यांची एकूण संख्या 17 झाली आहे.
2) गाडी क्रमांक 17630 / 17629 हजूर साहिब नांदेड – पुणे – हजूर साहिब नांदेड एक्स्प्रेस मध्ये एक तृतीय श्रेणी वातानुकुलीत डब्बा आणि एक द्वितीय श्रेणी शयन यान (स्लीपर क्लास) चा डब्बा असे दोन डब्बे हजूर साहिब नांदेड येथून सुटणाऱ्या गाडीत दिनांक 03 एप्रिल ते 02 मे पर्यंत आणि पुणे येथून सुटणाऱ्या गाडीत दिनांक 04 एप्रिल ते 03 मे पर्यंत वाढविण्यात आले आहेत , या वाढी नंतर या गाडीत डब्यांची एकूण संख्या 17 झाली आहे.