
नांदेड (प्रतिनिधी) – भाजपा सरकारच्या विरोधात निर्भिडपणे उभे राहणाऱ्या काँग्रेस नेत्यांच्या विरोधात सुडबुद्धीने मोदी सरकार वागत आहे. यातूनच नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेत्या श्रीमती सोनिया गांधी व लोकसभेचे विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी यांच्या विरोधात ईडी मार्फत कार्यवाही केली आहे. असा आरोप करत नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरुवार (ता.१७) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी केंद्रातील मोदी सरकार राजकीय सूडबुद्धीने नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेत्या श्रीमती सोनिया गांधी व लोकसभेचे विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधींसह इतर जेष्ठ नेते मंडळी विरोधात ईडी मार्फत कारवाई केली जात आहे. ही राजकीय द्वेषपुर्ण कारवाई आहे, असे सांगत नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयापुढे मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी उत्तर जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष बी.आर. कदम, महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार, ज्येष्ठ नेते इश्वरराव भोसिकर, डॉ. श्रावण रँपनवाड, अँड. सुरेंद्र घोडसकर, केदार पाटील सांळुखे, राजेश पावडे, महेश देशमुख तरोडेकर, आनंद चव्हाण, बालाजी चव्हाण, अनिल मोरे, मसुद खान, शमिम अब्दुला, प्रफुल्ल सावंत, अब्दुल गफार, रहीम खान, अजिज कुरेशी, सुरेश हटकर, गंगाधर सोंडारे, गंगाधर सोनकांबळे, सत्यपाल सावंत, गोविंद बाबा गोंड, डॉ. रेखा चव्हाण, डॉ. करुणा जमदाडे, शंकर शिंदे, बापूसाहेब पाटील, गणेश पाटील, मुन्ना अब्बास, माधव पवळे दिपकसिंग हजुरीया, गगन यादव, संजय वाघमारे, महेश शिंदे, अनिल कांबळे, बाबूराव पांडागळे, रफिक पठाण, प्रसेनजित वाघमारे, नुर मामु, जेशिका शिंदे, नसिम पठाण, धनंजय उमरीकर, गोविंद पाटील, अंबादास राताळे, गणेश पाटील, प्रथमेश गिरी, श्याम पाटील मनाटकर, आदीसह इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.