नांदेड- मालमत्ता कर सुट व थकबाकी शास्ती सुट योजनेचा नागरिकांना लाभ घेता यावा याकरिता मनपा क्षेत्रिय कार्यालय क्र.४ वजिराबाद अंतर्गत दिवशी दि. १३.०२.२०२४ ते १५.०२.२०२४ या कालावधीत रोजी सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० या वेळेत खड़कपुरा पाण्याच्या टाकीजवळ मनपा दवाखाना येथे मालमत्ता कर व पाणी कर वसुलीचा कॅम्प आयोजित केला आहे. तरी या परिसरातील नागरीकांनी शास्ती माफीचा लाभ घ्यावा असे आवाहन मनपा प्रशासना तर्फे करण्यात येत आहे.
क्षेत्रिय कार्यालय क्र.४ वजिराबाद अंतर्गत खड़कपुरा येथे सहाय्यक आयुक्त तथा क्षेत्रिय अधिकारी संजय जाधव यांच्या नियंत्रणाखाली सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० पर्यंत होणा-या कॅम्पमध्ये खड़कपुरा प्रभागातील (वसुली वार्ड क्र. 2.1,2.2,2.3,2.4,2.5,2.6,2.7) कर वसुलीसाठी कर निरीक्षक अजहर अली जुल्फेखार अली,वसुली लिपिक शेख खदीर शेख मेहमूद,नारायण आठवले व देविदास शेंडगे यांची नियुक्ती करण्यात आली असून खडकपुरा, देगांवचाळ, नल्लागुटाचाळ, भिमघाट, दुलेशाह रहेमान नगर इत्यादी भागातील नागरिकांनी या विशेष कर वसुली कॅम्पला प्रतिसाद देवुन मालमत्ता करातील शास्ती वरील ४०% व पाणीपट्टी करातील शास्ती वरील ५०% सुट्टीचा लाभ नागरीकांनी घ्यावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.