
नांदेड (प्रतिनिधी) – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सुचनेनुसार व खा. वसंतराव चव्हाण, आ. मोहनराव हंबर्डे यांच्या शिफारशी नुसता काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी काँग्रेस अनुसूचित जाती विभाग नांदेड जिल्हाध्यक्ष पदी माजी नगरसेवक प्रतिनिधी तथा सामाजिक कार्यकर्ते सुरेश हटकर यांची निवड केली आहे.
गत दोन दशकांपासून काँग्रेस विचारधारेशी एकनिष्ठ असलेले सामाजिक कार्यकर्ते तथा भीम शक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश हटकर यांची काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. खा. वसंतराव चव्हाण, आ. मोहनराव हंबर्डे यांच्या शिफारशीनुसार व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सुचनेनुसार अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी ही निवड केली आहे. आ. माधवराव पाटील जवळगावकर, जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार, प्रा. रवींद्र चव्हाण, अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रफुल्ल सावंत, भीम शक्ती प्रदेश कार्याध्यक्ष तथा काँग्रेस कमिटी शहर जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. दिनेश निखाते, राजू एगडे, आनंद चव्हाण, प्रा. यशपाल भिंगे, दिलीप पाटील बेटमोगरेकर, सुरेंद्र घोडसकर, श्रावण रँपनवाड, श्याम दरक, अनिल मोरे, जे. पी. पाटील, गंगाधर सोंडारे, शमिम अब्दुला, सुभाष रायबोळे, अजिज कुरेशी, राजेश पावडे, महेश देशमुख, केदार पाटील साळुंखे, गंगाधर सोनकांबळे, मुन्ना अब्बास, रमेश गोडबोले, पप्पू पाटील कोंडेकर, कुमार कुर्तडीकर, विठ्ठल पावडे, डॉ. रेखाताई चव्हाण, रहिम खान, अब्दुल गफार, डॉ. करुणा जमदाडे, बापूसाहेब पाटील, मुन्तजिब, सत्यपाल सावंत, अतुल पेदेवाड, शंकर शिंदे, शेख मुख्तार, आदीसह इतर पदाधिकारी, यांनी या निवडी बदल सुरेश हटकर यांचे अभिनंदन केले आहे.