
नांदेड- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नांदेड ग्रामीण जिल्हाध्क्षपदी भगवानराव पाटील आलेगावकर यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षा चे प्रदेश अध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी ही नियुक्ती केली असून आलेगावकर यांच्या या नियुक्ती चे नांदेड जिल्ह्यात जोरदार स्वागत केले जात आहे. आलेगावकर यांनी पक्षासाठी दिलेले योगदान लक्षात घेऊन त्यांची नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षासाठी नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाची संघटनात्मक बांधणी उत्तमरित्या करून पक्ष मजबूत करण्यासाठी आपण सर्वशक्तीनिशी योगदान द्याल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षा चे प्रदेश अध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केला. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पक्षाची ध्येय-धोरणे तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण खा. शरदचंद्र पवार साहेब यांचे विचार सर्वदूर पोहोचविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत असे आलेगावकर यांनी सांगितले. निवड केल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम,ज्येष्ठ नेत्या माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील,माजी राज्यमंत्री डॉ.माधवराव किन्हाळकर,माजी आमदार प्रदीप नाईक यांचे आलेगावकर यांनी आभार व्यक्त केले. नांदेड जिल्हामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे नूतन जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर यांनी सांगितले. यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे राष्ट्रवादी कॉंग्रेस चे शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुनील कदम,प्राध्यापक डीबी जांभरुणकर,सुभाष गायकवाड, गजानन पाम्पटवार यांनी अभिनंदन केले आहे.