मुंबई दि. २८ ऑगस्ट २०२४
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या निवड समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते मधुसुदन मिस्री हे महाराष्ट्राच्या दौ-यावर असून त्यांनी आज टिळक भवन, दादर येथे राज्यातील वरिष्ठ नेत्यांशी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा केली.
आज सकाळी महाराष्ट्र विधानसभेसाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने नियुक्त केलेल्या निवड समितीचे अध्यक्ष मधुसुदन मिस्री, सदस्य खा. सप्तगिरी उलाका, डॉ. श्रीवेल्ला प्रसाद, मन्सूर अली खान हे महाराष्ट्राच्या दौ-यावर आले आहेत. सकाळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षाचे नेते व cwc सदस्य बाळासाहेब थोरात, प्रदेश कार्याध्यक्ष व cwc चे विशेष निमंत्रीत सदस्य नसीम खान, विधानपरिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आ. सतेज ऊर्फ बंटी पाटील, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, आदिवासी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजीराव मोघे, माजी मंत्री के. सी. पाडवी, डॉ. नितीन राऊत, खा. प्रतिभाताई धानोरकर, विधानसभेतील काँग्रेस पक्षाचे प्रतोद आ. सुरेश वरपुडकर, आ. भाई जगताप, आ. सुभाष धोटे, माजी मंत्री सुरेश शेट्टी, प्रा. वसंत पुरके, आ. कैलाश गोरंट्याल आ. अभिजीत वंजारी आ. शिरीष चौधरी माजी खासदार कुमार केतकर यांच्यासह वरिष्ठ नेत्यांनी मिस्त्री यांची भेट घेतली.
—