मुंबई : काँग्रेसच्या अंतर्गत सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे की आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस समोर येणार पक्षाला 85 जागा मिळू शकतात
तर भाजप 62 जागांवर विजयी होतील. एकंदरीत आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचा पराभव होणार आहे तर महाविकास आघाडी विजयी होणार आहे. रिपोर्ट्सनुसार, काँग्रेसने स्वतः एक सर्व्हे केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो, असे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. 85 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर भाजपच्या 62 जागा मिळतील. म्हणजेच पक्षांच्या बाबतीत ती दुसऱ्या क्रमांकावर असेल. राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) महाविकास आघाडीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरू शकतो, 55 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला या सर्वेक्षणात 30 जागा देण्यात आल्या आहेत. महाविकास आघाडीत सामील असलेल्या पक्षांच्या एकूण जागांवर नजर टाकली, तर स्पष्ट बहुमत म्हणजे 180 जागा जिंकल्या जातील असा अंदाज आहे. महायुतीचा विचार केला तर भाजपच्या ६२ जागां व्यतिरिक्त एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ३० तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ९ जागा मिळण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे महायुतीच्या पक्षांना मिळालेल्या एकूण जागांची संख्या अंदाजे १०१ आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील थेट स्पर्धा लक्षात घेऊन हे सर्वेक्षण करण्यात आले आहे.